WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्र,महाराष्ट्र 2023 देशातील एकुण योजनांमध्ये हि एक महत्त्वाची योजना आहे. ज्यामुळे लाखो तरुणांना रोजगार प्राप्त व्हायला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मदत होत आहे.

कौशल्य विकास केंद्रे म्हणजे काय: ही केंद्रे देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये व्यावसायिक प्रशिक्षण देतात.भारताला जगातील कौशल्य भांडवल बनवणे हे केंद्राचे उद्दिष्ट आहे. कौशल्य विकासामुळे बेरोजगारी कमी होऊ शकते, उत्पादकता वाढू शकते आणि जीवनमान सुधारू शकते . तरुणांना उत्तम उपजीविका मिळवण्यासाठी प्रशिक्षण घेण्यास सक्षम करणे हा त्याचा उद्देश आहे

आज भारतात लाखो युवा आहेत ज्यांना उत्तम प्रशिक्षण देता येऊ शकते. सर्वोत्तम दिशा आणि मार्गदर्शन तसेच प्रशिक्षण घेऊन ते स्वावलंबन जिवंत जागु शकतात म्हणुन आज ऑक्टोबर 2023 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात 511 प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्र सुरू केले आहेत. या केंद्रांमध्ये युवकांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन सक्षम बनवले जाऊ शकते.

प्रधानमंत्री कौशल विकास योजना (PMKVY). याला पंतप्रधान युवा प्रशिक्षण कार्यक्रम असेही म्हणतात. ही योजना भारत सरकारने जुलै 2015 मध्ये सुरू केली होती. या योजनेअंतर्गत 2020 पर्यंत एक कोटी तरुणांना प्रशिक्षण देण्याची योजना आखण्यात आली होती.प्रमोद महाजन हे एक भारतीय राजकारणी होते त्यांनी बरीच मंत्रिपद भूषवले त्यातले एक म्हणजे संरक्षण मंत्री. त्याचे योगदान बघता त्यांच्या नावाने महाराष्ट्रात 511 प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्रांचे उद्घाटन PM मोदींनी केले.

ही केंद्र सरकारच्या प्रमुख योजनांपैकी एक आहे. हे कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाद्वारे चालवले जाते. या योजनेचा उद्देश देशातील तरुणांना उद्योगाशी संबंधित प्रशिक्षण देणे हा आहे जेणेकरून त्यांना रोजगार मिळण्यास मदत होईल. यामध्ये सरकार स्वतः प्रशिक्षणाचे शुल्क भरते. या योजनेद्वारे, सरकार कमी शिक्षित तरुणांना किंवा 10वी, 12वी वर्ग सोडलेल्यांना कौशल्य प्रशिक्षण प्रदान करते.या योजनेत नोंदणी तीन महिने, सहा महिने आणि एक वर्षासाठी आहे. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र दिले जाते. हे प्रमाणपत्र संपूर्ण देशात वैध आहे.

.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आज जगात असे अनेक देश आहेत जिथे वृद्धांची संख्या सातत्याने वाढत आहे. अशा कुशल तरुणांची गरज आहे. भारताने अशा तरुणांना तयार केल्यास ते मोठ्या संख्येने परदेशात नोकरीसाठी जाऊ शकतात. मात्र त्यासाठी त्यांनी आधी कौशल्य प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे. या तरुणांना तयार करण्याचे काम महाराष्ट्राचे हे प्रशिक्षण केंद्र करणार आहे. येत्या काळात सरकारने त्यांची संख्या वाढवण्याची गरज आहे.

यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ही कौशल्य विकास केंद्रे राज्यातील तरुणांसाठी मंदिर ठरतील. यामुळे दरवर्षी सुमारे 50 हजार कुशल तरुणांची फौज तयार होईल. पंतप्रधानांनी अलीकडेच सुरू केलेल्या पीएम विश्वकर्मा योजनेला पुढे नेण्यासाठी महाराष्ट्रातील नवीन केंद्रेही काम करतील.

नोंदणी कशी करावी: अर्जदाराने प्रधानमंत्री कौशल विकास योजनेत स्वतःची नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी http://pmkvyofficial.org वर जाऊन नाव, पत्ता आणि ईमेल इत्यादी माहिती भरावी लागेल. फॉर्म भरल्यानंतर, अर्जदाराला ज्या तांत्रिक क्षेत्रामध्ये प्रशिक्षण घ्यायचे आहे ते निवडावे लागेल. यामध्ये बांधकाम, इलेक्ट्रॉनिक्स आणि हार्डवेअर, फूड प्रोसेसिंग, फर्निचर आणि फिटिंग्ज, हस्तकला, ​​रत्ने आणि दागिने , चामड्याचे तंत्रज्ञान अशी तांत्रिक क्षेत्रे देण्यात आली आहेत. तसेच पसंतीच्या तांत्रिक क्षेत्रापैकी एक अतिरिक्त तांत्रिक क्षेत्र देखील निवडावे लागेल. ही माहिती भरल्यानंतर तुम्हाला तुमचे प्रशिक्षण केंद्र निवडावे लागेल.

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेच्या (PMKVY) विशेष गोष्टी:प्रधानमंत्री कौशल विकास योजना (PMKVY) साठी कोणतीही फी द्यावी लागत नाही. उलट प्रोत्साहन म्हणून सुमारे 8000 रुपये सरकार बेरोजगार तरुणांना देते.प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना (PMKVY) मध्ये ट्रेनिंग यशस्वी पूर्ण केल्यानंतर सरकार आर्थिक सहायता करण्यासोबतच नोकरी देण्यासाठीही मदत करते. रोजगार मेळावे आयोजित करून सरकार अशा प्रशिक्षित तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मदत करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *