किसान ट्रॅक्टर योजना,, शेतकरी ट्रॅक्टर योजना 2023, नमस्कार मित्रांनो मी ट्रॅक्टर योजनेत तुमच स्वागत करतो. ज्यात तुम्हाला कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये अनुदानातून ट्रॅक्टर मिळेल.
भारत सरकार देशातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि विकासासाठी विविध योजना सुरू करत आहे. त्यातीलच एक योजना म्हणजे किसन ट्रॅक्टर योजना.
प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर योजना काय आहे ..?
याचा कोण लाभ घेऊ शकतो ..?
कितपत याच्यात अनुदान मिळू शकतं..?
किसान ट्रॅक्टर योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणते आहेत…?
एकूण अशी आवश्यक माहिती तुम्हाला मिळणार आहे .
आता सध्या शेती करण्यासाठी यंत्रसामग्रीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. आणि ट्रॅक्टर हा खुप महत्त्वाचा घटक आहे, ज्यामुळे शेती करणे सोपे झाले आहे. पीएम किसान ट्रॅक्टर योजना म्हणजे ज्या गरजू शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी करता येत नाही त्यांना अनुदान उपलब्ध करून देणे.
राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण कार्यक्रमासाठी सन २०२२ – २३ करिता रुपये 240 कोटी निधीचे कार्यक्रमास दिनांक 2 मे 2022 रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता दिली असून पहिल्या टप्प्यात रुपये 56 कोटी निधी वितरित करण्यात आला आहे.
PM किसान ट्रॅक्टर योजना ही देशातील शेतकऱ्यांना मदत करणारी योजना आहे. नावाप्रमाणेच ही योजना ट्रॅक्टरशी संबंधित आहे. ट्रॅक्टर हा शेतीचा एक महत्त्वाचा भाग आहे परंतु त्याची किंमत जास्त असल्याने सर्वच शेतकऱ्यांना ते परवडत नाही. अशा परिस्थितीत त्यांना ट्रॅक्टर भाड्याने घ्यावा लागतो आणि त्यामुळे खर्च वाढतो. ही परिस्थिती लक्षात घेऊन सरकारने ट्रॅक्टर योजना सुरू केली ज्या अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी अनुदान दिले जाते. ही योजना महाराष्ट्र, मध्य प्रदेश, आसाम, बिहार इत्यादी देशातील अनेक राज्यांमध्ये त्याच्य स्तरावर आधीच लागू केली जात आहे.
वैशिष्टय़े :
1] कोणताही शेतकरी अर्ज करू शकतो.
2] 20 ते 50 टक्के पर्यंत अनुदान.
3] केंद्र व राज्य पुरस्कृत योजना.
आवश्यक दस्तावेज :
•आधार कार्ड
•पासपोर्ट साईज फोटो
•रहिवासी दाखला
•जमिनीचा सातबारा उतारा
•बँक डिटेल्स •मोबाईल नंबर, ..इत्यादी
अटी आणि शर्ती :
– भारताचा रहिवासी .
– उपजत शेती
.- बॅंकेने त्यांना दिवाळखोर घोषित केले नसावे.
– 7 वर्षाच्या काळात या योजनेचा लाभ घेतला नसावा.
– तसेच कोणत्याही शेतकर्यांनी नवीन ट्रॅक्टर घेतले नसावे.
देशातील कोणताही शेतकरी ज्याला शेतीसाठी ट्रॅक्टर घ्यायचा आहे तो या योजनेद्वारे आपला अर्ज सादर करू शकतो. अर्ज केल्यानंतर, जर ते पात्रतेचे निकष पूर्ण करण्यात यशस्वी ठरले, तर सरकार त्यांना ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी 20 ते 50 टक्के अनुदानाची रक्कम देईल. ही योजना केंद्र सरकारने सुरू केली आहे, मात्र त्यासाठी तुम्हाला राज्य सरकारकडे अर्ज सादर करावा लागेल. प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर योजनेचे अर्ज काही राज्यांमध्ये ऑनलाइन आणि काही राज्यांमध्ये ऑफलाइन घेतले जातात.
काही अटी व शर्ती- ट्रॅक्टर अनुदान योजनेतून अनुदान देण्यात आलेल्या ट्रॅक्टरची किमान ६ वर्षे आणि ट्रॅक्टर चलीत अवजारांची किमान ३ वर्ष विक्री करता येणार नाही अन्यथा अनुदान म्हणून देण्यात आलेली अनुदान रक्कम वसुली केली जाणार आहेएका लाभार्थ्यास ट्रॅक्टर सोबत अनुदानावर ट्रॅक्टर चलित अवजारे घ्यावयाचे झाल्यास जास्तीत जास्त तीन अवजारे किंवा रुपये एक लाख अनुदान रकमेपर्यंत जेवढी अवजारे येतील तेवढी या दोन्हीपैकी जेकमी असेल त्या मर्यादेत अनुदान देय राहील.
ट्रॅक्टर वगळता केवळ अवजारे अनुदानावर घ्यावयाची असल्यास किमान तीन ते चार अवजारे अथवा रुपये एक लाख अनुदान रकमेत जेवढी अवजारे घेता येतील तेवढी यापैकी जे कमी असेल त्या मर्यादेत अनुदान देय राहील. कृषी अवजारे बँक घटकांमध्ये ट्रॅक्टर ( Tractor Anudan yojana ) किंवा रोटावेटर साठी अनुदान घेतले असेल आणि पुढील वर्षी ट्रॅक्टर किंवा रोटावेटर साठीचा निवड झाल्यास पहिला लाभ घेतल्यापासून किमान पाच वर्ष होईपर्यंत अनुदान अनुज्ञेय राहणार नाही.
कृषी विभागामार्फत केंद्र शासनाच्या मान्यता प्राप्त तपासणी संस्थांकडून तपासणी झालेल्या यंत्र अवजारासाठी अनुदान देण्यात येते त्यातील ज्या यंत्राचे ( ट्रॅक्टर, ट्रेलर परिवहन विभागाकडे नोंदणी ( RTO registration )आवश्यक असेल त्याबाबतची प्रक्रिया पार पडण्याची जबाबदारी संबंधित उत्पादक विक्रेता व लाभार्थी शेतकरी याची असेल. कृषी विभागाची भूमिका हा केवळ अनुदान देण्यापूर्ती मर्यादित असेल ) नोंदणी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच अनुदान अनुज्ञेय राहील.ट्रॅक्टरचलित अवजारांच्या अनुदानासाठी लाभार्थी शेतकऱ्याकडे ट्रॅक्टर असणे बंधनकारक राहील .तसेच ज्या लाभार्थ्याकडे स्वतःच्या नावे ट्रॅक्टर नाही परंतु अविभक्त कुटुंबातील सदस्याकडे ट्रॅक्टर आहे अशा लाभार्थ्यास ट्रॅक्टर चलित अवजाराचा लाभ देय राहील तथापि कुटुंबातील ज्या सदस्याकडे ट्रॅक्टर आहे त्याचा ना हरकत दाखला सादर करणे आवश्यक राहील.सर्व प्रकारच्या यंत्र अवजारावर लाभार्थ्याचे नाव, योजनेचे नाव ( Tractor Anudan yojana ) , अनुदान वर्ष, कमाल विक्री किंमत, एमआरपी अनुदान रक्कम ई तपसिल कायमस्वरूपी राहील अशा स्वरूपात नोंदविणे हे आवश्यक राहील याबाबतची खातरजमा मोका तपासनीच्या वेळी केली जाईल. एकाच यंत्र अवजाराची अनेक शेतकऱ्यांना विक्री होऊन नये यासाठी तालुका कृषी अधिकारी यांनी आठवड्यातील ठराविक दिवस निश्चित करून सर्व विक्रेत्याकडून अनुदानावर विक्री करण्यात आलेल्या व वितरित करण्यात येणाऱ्या यंत्र अवजाराची माहिती घेऊन कृषी ग्राम समितीच्या उपस्थितीत वितरण करण्यात यावी त्याची प्रसिद्धी करण्यात यावी.
एकदा अर्ज केल्यानंतर तो अर्ज आपला स्वीकृत झाला तर आपल्याला एक रकमे 50% एवढी रक्कम भरावी लागते आणि उर्वरित सबसिडी 50% पर्यंत आपल्याला बँक खात्यात प्राप्त होते .हा अर्ज ग्रामपंचायत मधून करता येतो किंवा एखाद्या वैयक्तिक सीएससी सेंटरला विजिट करून सुद्धा अर्ज भरता येतो म्हणून प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावाच घ्यावा…..
आणि सगळ्यात मोठी अट म्हणजे जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपलं बँक खातं आधार शी लिंक असणे अत्यावश्यक आहे.आपल्या देशात सर्वाधिक जी आत्महत्या होते ती म्हणजे शेतकऱ्यांची आणि शेतकऱ्यांची आत्महत्या होण्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे कर्जाचा बोजा यासाठी शेतीचे उत्पादकता वाढावं खर्च कमी व्हावा म्हणून ही योजना खूप चांगल्या प्रकारे काम करत आहे.पक्ष कोणताही असो पण सरकार जो पक्ष चालवतो मग तो काँग्रेस असो बीजेपी असो किंवा इतर कोणताही असो तो प्रत्येक पक्ष शेतकऱ्याचा लाभासाठी काही ना काही प्रयत्न नक्कीच करतो आणि त्यातलाच एक भाग म्हणजे किसान ट्रॅक्टर योजना.